वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात उपक्रम
*💫वेंगुर्ला दि.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरातील पूजा-यांना व भाविकांना आर्सेनिक अल्बम-३०या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर क्लबचे डॉ.संजिव लिगवत यांनी ह्या गोळ्या वितरीत केल्या. यावेळी मंदिराचे पूजारी सुभाष नातू, अजित दामले यांच्यासह पपू कुबल, स्नेहा कुबल, विकास कुबल, संगिता कुबल, शाम शेटये, किरण शिरोडकर, सुनिल अंधारी आदी व अन्य भक्तमंडळी उपस्थित होते.
