ग्रामस्थांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा: देवेंद्र शेटकर
*💫दोडामार्ग दि२४ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खोक्रल येथील दोन्ही पुलावरील काँक्रीट वाहुन गेल्याने हा पुल वाहतुकीस धोकादायक बनला आहे.हा पुल वाहतुकीस सुरळीत व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता मात्र त्या पाठपुराव्याकडे प्रशासन पुर्णपणे डोळेझाक करताना दिसत आहे. गेल्या तीनवर्षापासुन स्थानिक लोकांच्या सहाय्याने पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र त्याकडे जि.प.बांधकाम विभाग पुर्णपणे डोळेझाक करताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर यांच्या वतीने सांगण्यात आले.
