*💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता येथील साई मंगल कार्यालयात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तौक्ते चक्रीवादळामध्ये जीवाची बाजी लावत विद्युत पुरवठा सुरळीत करण्या-या महावितरण कंपनीच्या १०३ कर्मचा-यांचा तसेच कोविड-१९च्या कालावधीमध्ये सामाजिक बांधिलकी राखून काम करणा-या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संफप्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संफप्रमुख शैलेश परब व विक्रांत सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला शिवसेनेतर्फे २७ जुलै रोजी विविध कार्यक्रम
