Headlines

Global Maharashtra Breaking News

शासकीय गणवेश, ओळखपत्र द्या तसेच भाऊबीज रक्कम वाढवा

अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेचे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांना निवेदन *⚡ओरोस ता.१८-:* जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना विविध मागण्या व समस्यांचे निवेदन सादर केले. शासकीय गणवेश, ओळखपत्र, भाऊबीज रक्कम वाढवावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. दिवसाला १०० रुपये या तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन स्त्री परिचर काम करीत असून शासनाच्या…

Read Full News

कोल्हापूर खंडपीठासाठी सकारात्मक प्रयत्न करणार

अँड संग्राम देसाई;बार कौन्सिलच्या सत्कार कार्यक्रमात केले प्रतिपादन ओरोस-:बार कौन्सिलच्या नाम फलकावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव कोरण्यात बार कौन्सिलच्या सर्व वकिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या समस्या बरोबर कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न केले जातील. तसेच सिंधुदुर्ग चे नाव  बार कौन्सिल नकाशावर अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे सूचक  उद्गगार नूतन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र…

Read Full News

दांडेली-घोणसेवाडी लोखंडीपूल ये-जा करण्यास धोकादायक

अपघात होण्याची शक्यता ः रुग्णांना न्यावे लागते हातावरून *⚡बांदा ता.१८-:* दांडेली-घोणसेवाडी व फणसमाडे या वाड्यांना जोडणारे लोखंडी पूल गंजले असून ये-जा करण्यासाठी धोकादायक बनले आहे. पुलावरील लोखंडी पत्रे निखळल्याने दुचाकी नेणे सुद्धा जीवावर बेतणारे आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना केवळ हातावरून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत असल्यामुळे सदर पुलाची तात्काळ दुरूस्ती करून कायमस्वरुपी कॉंक्रिटचे पूल बांधण्याची मागणी…

Read Full News

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना खा. विनायक राऊत यांच्या पाठीशी- आ. वैभव नाईक

*…तर जनता राणेंना काय म्हणून आशीर्वाद देणार..! *⚡कणकवली ता.१७-:* कोविड महामारी असो, कोकणात झालेली चक्रीवादळे असो, मराठा आरक्षण असो या सर्व प्रश्नांवर अगोदर सत्ताधारी भाजप पक्षाचे खासदार असलेल्या व आता केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी कोकणच्या जनतेसाठी काय दिले हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेत जनता राणेंना काय म्हणून आशीर्वाद देणार याचे…

Read Full News

भाजप युवा नेते विशाल परब गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला रवाना

खासदार नारायण राणे यांच्या दौऱ्यात सहभागी होणार *सावंतवाडी ता.१७-:* केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे हे १९ ऑगस्ट पासून मुंबईहुन जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करत असून, याच पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब हे आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी रवाना झाले आहेत.

Read Full News

आंबोली येथे मधुमक्षिका पालनतून रोजगार व मेनन कंपनीच्या जागेत उद्योग आणावा

आंबोलीसरपंच व उपसरपंच यांची ना.नारायण राणे यांच्याकडे मागणी *⚡आंबोली, ता.१७-:* आंबोली येथे मधुमक्षिका पालन व्यावायिकते च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच मेनन कंपनीच्या जागेत उद्योग व्यावसाय आणावा यासाठीचे निवेदन देवून मागणी आंबोली सरपंच गजानन वामन पालेकर आणि उपसरपंच सदाशिव उर्फ दत्तू वसंत नार्वेकर यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे दिल्ली येथे भेट घेवून केली….

Read Full News

सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची गंगाखेड येथे बदली

श्री विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार *⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी वनक्षेत्रपाल.गजानन पाणपट्टे यांची बदली गंगाखेड वनक्षेत्रपाल पदी झाली आहे.त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अतिशय उत्तम काम केले आहे.याची दखल घेत श्री विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटनेच्या वतीने सन्मानपत्र,शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आज सत्कार करण्यात आला. कोरोना काळात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत उत्तम सेवा बजावली.वेळ प्रसंगी आपल्या…

Read Full News

मदतीपासून वंचित मच्छिमारांच्या प्रश्नावर माजी खास. निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला दिली धडक *⚡मालवण ता.१७-:* भाजप प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी मदतीपासून वंचित राहिलेल्या मच्छिमारांच्या प्रश्नावर सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी डॉ राणे यांनी चुकीच्या पद्धतीने झालेल्या पंचनाम्यांमध्ये मत्स्य विभागातील ज्यांचे ज्यांचे हात बरबटले त्या सर्वांची चौकशी आम्ही लावणार असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना…

Read Full News

वैभववाडी तालुक्यातील प्रमुख मार्गांची अवस्था दयनीय;रस्त्यांवर खड्डेच खड्डे

तात्काळ दुरुस्ती करण्याची वैभववाडी तालुका काँग्रेसच्यावतीने मागणी *⚡वैभववाडी ता.१७-:* वैभववाडी तालुक्यातील प्रमुख मार्गांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.उंबर्डे – एडगाव व करूळ – वैभववाडी हे दोन रस्त्यांवर ठीकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरुन वाहतुक करणे धोकादायक आहे.या रस्त्यावर खडी टाकून तत्काळ दुरुस्ती करावी,या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका काँग्रेसच्यावतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय, वैभववाडी यांना दिले…

Read Full News

ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीच्या नूतन इमारतीचे उदघाटन

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्रामपंचायतीने केला सत्कार *⚡दोडामार्ग ता.१७-:* ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा स्वातंत्र्य दिनी पार पडला. या उदघाटन सोहळ्यात कोविड काळात बहुमोल भूमिका पार पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर, शिक्षण क्षेत्रातही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार तसेच केर गावातील प्राचीन आयुर्वेदिक…

Read Full News

You cannot copy content of this page