श्री विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार
*⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी वनक्षेत्रपाल.गजानन पाणपट्टे यांची बदली गंगाखेड वनक्षेत्रपाल पदी झाली आहे.त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अतिशय उत्तम काम केले आहे.याची दखल घेत श्री विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटनेच्या वतीने सन्मानपत्र,शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आज सत्कार करण्यात आला. कोरोना काळात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत उत्तम सेवा बजावली.वेळ प्रसंगी आपल्या खिशातून पैसे देत त्यांनी कोरोना लढाईत मोलाचा वाटा उचलला.चार वर्षांपूर्वी सांगली येथे दुष्काळ पडला असता त्यांना एक ट्रक चारा दिला होता,मुक्या प्राण्यांची सेवा केली,अशा प्रकारे त्यांनी नवीन आदर्श घालून दिला. त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर,तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा मालवणकर,आरोस येथील लक्ष्मण(भाई)देउलकर,समीर शेख,बाबू नदाफ,सत्यवान धुरी, दादा राऊळ,राजन गावडे,आदी उपस्थित होते.
