संततधार पडत असलेल्या पावसामुळे कळसुली-हर्डी रोडवर दरड कोसळली
*⚡कणकवली ता.०७-:* कळसुली-घोडगे रोडवर हर्डी सातनाका वळणावर बीएसएनएल टॉवर नजीक संततधार पडत असलेल्या पावसाने कळसुली सातनाका येथील दरड कोसळून कळसुली-घोडगे रस्त्यावर दगड माती आली आहे. दोन दिवसांपूर्वी दरड थोडी थोडी कोसळत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. कळसुली गावात भुस्खलन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळेच दरड कोसळली असावी, अशी चर्चा कळसुली गावात आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव…
