महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सांस्क्रुतीक विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रविण वरुणकर

*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील तळरे येथील प्रविण वरुणकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सांस्क्रुतीक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्क्रुतीक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रविण वरुणकर यांची नियुक्ती सांस्क्रुतीक विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ .विद्याताई कदम यांच्या सुचनेनुसार म. प्र. काँग्रेस कमिटीच्या सांस्क्रुतीक विभागाचे सरचिटणीस आणि राज्य समन्वयक सम्राट साळवी तसेच उपाध्यक्ष व कोकण विभाग समन्वयक राकेश चौहान यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती केली. यावेळी राज्य उपाध्यक्ष व पश्चीम महाराष्ट्र समन्वयक अँड. महादेव कांबळे ,कणकवली तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर व तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले .

You cannot copy content of this page