अन्यथा शिवसेना आंदोलनात्मक भूमिका घेणार; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर
*⚡सावंतवाडी ता.०७-:* पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करण्या संदर्भात शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा येथील शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदनद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे कि शासन तथा केंद्र शासनाकडे आमच्या भूमिका पोहोचवा सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाचं त्रस्त झाला आहे या संकटातून कोणीही सुटलेले नाही असे असून देखील घरगुती वापराच्या गॅस किंमती मध्ये भरमसाट वाढ करण्यात आली आहे यामुळे गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे तर पेट्रोल डिझेल किमतीत देखील भरमसाठ वाढ करण्यात आली आहे त्यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्या अशी मागणीचे निवेदन शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.खांडेकर यांना देण्यात आले. यावेळी नगरसेविका आनारोजीन लोबो शुभांगी सुकी सुरेंद्र बांदेकर सुरेश भोगटे गीता सुकी भारती मोरे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार विशाल सावंत सतीश नार्वेकर आदी उपस्थित होते.
