खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या पहिल्या ट्रेनचे शानदार स्वागत

खारेपाटण दशक्रोशीसह ६० गावातील नागरिकांना रेल्वे स्टेशनचा होणार फायदा

*⚡कणकवली ता.०७-:* खारेपाटण सह आजूबाजूच्या ४० ते ६० गावांना फायदेशीर व सोयीचे ठरणारे बहुचर्चित व प्रलंबित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारा वरील चिंचवली येथील कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर प्रथमच सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गणपती स्पेशल गाडी थांबविण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जि प अध्यक्ष सौ. संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला थांबलेल्या पहिल्या ट्रेनचे शानदार स्वागत करण्यात आले. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझी यांनी यावेळी दिली. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर आज पहिल्या थांबलेल्या रेल्वेचे स्वागत कर्यक्रमाला जि प अध्यक्ष संजना सावंत जि प स्थायी समिती अद्यक्ष तथा माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, पंचायत समिती सदस्य सौ तृप्ती माळवदे,खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी, सचिव – सूर्यकांत भालेकर कणकवली प स माजी सभापती दिलीप तळेकर,माजी जि प महिला बालकल्याण सभापती श्रीम रत्नप्रभा वळंजू,चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर,नडगिवे उपसरपंच अरुण कर्ले,खारेपाटण तालुका कृती समितीचे पदाधिकारी मंगेश गुरव,रवींद्र मांजरेकर,संतोष पाटणकर ,चिंचवली तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर भालेकर आदी मान्यवर व दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. खारेपाटणच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांने कोरोव असा आजचा दिवस असल्याने खारेपाटण वासीयांचे गेले अनेक वर्षाचे स्वप्न यानिमिताने साकार झाल्याने ग्रामस्थमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर पहिल्या थांबलेल्या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. तर खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी जि प स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र जठार यांच्या शुभ हस्ते पहिल्या ट्रेनचे खारेपाटण येथे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गाडीचे मोटरमन यांचे जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथून पहिला प्रवास करण्याचा मन चिंचवली भंडारवाडी येथील रहिवासी निकष वैजनाथ मगर याना मिळाला.त्यांनी खारेपाटण ते पनवेल असे खारेपाटण रेल्वे स्टेशनवरून ऑनलाइन तिकीट घेऊन सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गाडीने प्रवास केला. श्री मगर यांचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर सतीश कुंभार यांचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या पदाधिकऱ्यांचा वतीने स्वागत करण्यात आले. व त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्या देण्यात आल्या.

You cannot copy content of this page