शिवसेनेचा कोकणी माणसाबाबत दुजाभाव कशासाठी?आम.प्रसाद लाड यांचा सवाल

पालकमंत्र्यांकडून कोकणवासीयांचा दिशाभूल

*⚡कणकवली ता.०७-:* गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव आहे,त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार ते पाच लाख चाकरमानी दाखल होतात. मात्र त्यांना कडक नियम लावले जात आहेत, रेल्वे स्टेशनवर आणि सीमा नाक्यांवर त्यांची कसून चौकशी केली जाते. पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचा मी निषेध करतो. पालकमंत्र्यांनी काल सांगितले एक पण आता रेल्वे स्थानकांवर गर्दी बघा.शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री कोकणवासीयांचा दिशाभूल करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी केला. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार प्रसाद लाड बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, बाळू कुबल,तालुका अध्यक्ष मिलींद मेस्त्री,राजन चिके,,सुरेश सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशिर परुळेकर,प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत,संदीप मेस्त्री,भाई सावंत आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आम.प्रसाद लाड म्हणाले,कोकणातील जनतेच्या बाबतीत नेहमी शिवसेना मतांसाठी भावनिक राजकारण करत आहे. पण ज्यावेळी कोकणवासीयांना देण्याची वेळ येते,तेव्हा शिवसेनेचा हात आखडता असतो. गणेशोत्सव असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातच कुडाळ रेल्वे स्थानकांवर बनावट नोटा असलेली बॅग सापडली आहेत. या बागेमध्ये साडेचार लाख रुपयांच्या बनावट नोटा आहेत. मुळात गणेश उत्सव काळात चाकरमानी रोखीने व्यवहार करत असतात. त्यात बनावट नोटा मिसळण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या बनावट नोटा मागे सचिन वाझें कोण? याचा शोध पोलिसांनी घ्यावा.या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या असल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.

You cannot copy content of this page