शहरातील नागरिक राहत आहेत लसीकरणापासून वंचित

सेनेच्या नगरसेवकांनी घेतली वैद्यकीय अधीक्षकांची भेट;नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण सुरू करण्याची केली मागणी

*⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शहरा बाहेरून नागरिक येऊन लस घेत असल्याने शहरातील नागरिक लासिकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी पालिकेच्या दवाखान्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात यावी अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांची भेट घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावेळी डॉ. पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन मागणी करावी असा सल्ला दिला आहे.

यावेळी नगरसेविका आनारोजीन लोबो शुभांगी सुकी सुरेंद्र बांदेकर सुरेश भोगटे गीता सुकी भारती मोरे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार विशाल सावंत सतीश नार्वेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page