संततधार पडत असलेल्या पावसामुळे कळसुली-हर्डी रोडवर दरड कोसळली

*⚡कणकवली ता.०७-:* कळसुली-घोडगे रोडवर हर्डी सातनाका वळणावर बीएसएनएल टॉवर नजीक संततधार पडत असलेल्या पावसाने कळसुली सातनाका येथील दरड कोसळून कळसुली-घोडगे रस्त्यावर दगड माती आली आहे. दोन दिवसांपूर्वी दरड थोडी थोडी कोसळत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. कळसुली गावात भुस्खलन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळेच दरड कोसळली असावी, अशी चर्चा कळसुली गावात आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सा.बां. विभागाने या कोसळलेल्या दरडीची माती बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, कळसुली घोटगे मुख्य मार्गावर असून तातडीने कोसळलेल्या भागाची या संबंधित विभागाने पाहणी करून तातडीने रस्ता निर्धोक करावा, अशी मागणी कळसुलीसह घोटगे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page