Headlines

Global Maharashtra Breaking News

नितीन बगाटे जिल्ह्याचे नवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक

*⚡ओरोस ता.२१-:* जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची बदली झाल्याने त्या रिक्त जागी बगाटे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे ते सहाय्यक पोलीस अधिकारी म्हणून चिमूर उपविभाग-चंद्रपूर येथे कार्यरत होते

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२१-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 418.6870 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 93.59 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 23.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 86.8570, अरुणा – 78.8736, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 21.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3683.8575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 07(3619), सावंतवाडी –…

Read More

डेगवेचे वासुदेव देसाई यांना गणेशोत्सव गायन स्पर्धेत बहुमान

*⚡बांदा दि.२०-:* डेगवे गावाचे सुपुत्र आणि संगीत शिक्षक बुवा वासुदेव सखाराम देसाई यांना नुकताच गोपिकृष्ण गुरूकुल प्रा. संस्था ठाणे, आयोजित गणेशोत्सव गायन स्पर्धेत उत्कृष्ट अभंग गायनाचा बहुमान मिळाला. नुकतेच पुरस्कार ऑनलाईन आयोजित सोहळ्यात वितरित करण्यात आलेत. वासुदेव देसाई हे उत्कृष्ट भजनी कलाकार आहेत. त्यांनी आतापर्यंत डेगवे, सिंधुदुर्ग व गोव्यात शेकडोंच्या संख्येने भजने सादर केली आहेत….

Read More

अल्पवयीन मुलीचा अपहरण तपास वेगाने

भाजपने केले पीआयचे कौतुक *⚡वैभववाडी ता.२०-:* अल्पवयीन युवतीचे अपहरण तपासात चांगली कामगिरी केल्याबद्दल भाजपा वैभववाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष नासीर काझी, बंड्या मांजरेकर, महिला पदाधिकारी स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, शुभांगी पवार आदी उपस्थित होत्या. इंस्टाग्रामवर ओळख पटवत अहमदनगर येथील आरोपीने तालुक्यातील युवतीचे अपहरण केले होते….

Read More

त्या’ बेपत्ता तरुणाच्या शोधकार्यात दुसऱ्या दिवशीही अपयश

*⚡सावंतवाडी ता.२०-:* शहरातील एका खाजगी बँकेचे व्यवस्थापक मनोहर प्रभाकर गावडे (35) हे शनिवार रात्री पासून बेपत्ता आहेत, त्यांची इऑन गाडी ओटवणे पुलापासुन शंभर मीटरवर आढळून आल्याने आणि कारमध्ये चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामुळे त्याने नदीपात्रात आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात असुन पत्नी अपर्णा गावडे हिने पोलिसांत बेपत्ताच तक्रार दिली आहे. सावंतवाडी पोलिसांकडून शोधमोहीम…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी. ची मान्यता

खा.  विनायक राऊत आ.वैभव नाईक यांची माहिती *⚡मालवण ता.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आज केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कामिशन)ची मान्यता मिळाली आहे. या वर्षीपासून हे महाविद्यालय ओरोस येथे सुरु होणार असून या महाविद्यालयामध्ये एम.बी. बी.एस.च्या १०० जागा असणार आहेत. अशी माहिती खा.  विनायक राऊत आ.वैभव नाईक यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय…

Read More

बिबट्याच्या कातडीची तस्करीप्रकरणी पाचही संशयीतांच्या वनकोठडीत २३ सप्टेंबरपर्यंत वाढ

*⚡सावंतवाडी ता.२०-:* बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी वाहतूक करून वन अपराध करणाऱ्या ५ ही आरोपींना आज वन कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता पाचही संशयीत आरोपींना पुन्हा एकदा २३ सप्टेंबर पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

Read More

नडगीवे बांबरवाडी येथे एस. टी. निवारा शेडची मागणी

प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन सादर करीत वेधले लक्ष *⚡कणकवली ता.२०-:* मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटणपासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथे प्रवासी वर्गासाठी तसेच येथील नागरिकांसाठी आवश्यक असलेली एस. टी. निवारा शेड न बांधल्यामुळे येथील ग्रामस्थांनी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देऊन एस टी बस थांबा निवारा शेड…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी तालुक्यात आज ६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ० तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात आज एकही रुग्ण सापडला नसून, ग्रामीण भागात आरोस आणि कलंबिस्त येथे प्रत्येकी दोन – दोन रुग्ण सापडले असून, सावरवाड आणि न्हावेली येथे…

Read More
You cannot copy content of this page