बांदा/प्रतिनिधी
कास, मडुरा, शेर्ले, आरोसबाग, मीठगुळी मार्गे प्रवास करत तेरेखोल नदी पार करून ओंकार हत्तीने आज सकाळी शेर्ले सिद्धार्थनगरमार्गे बांदा शहरात प्रवेश केला आहे. सध्या तो बांदा येथील आळवाडी परिसरात तेरेखोल नदीच्या किनारी वावरत असल्याची माहिती मिळाली आहे.
ओंकार हत्ती बांदा शहराच्या हद्दीत दाखल झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, त्याला पाहण्यासाठी आळवाडी परिसरात बघ्यांची गर्दी झाली आहे. हत्तीच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून असून, नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ओंकार हत्ती बांदा शहरात दाखल झाल्याने वनविभागासह स्थानिक प्रशासनाचीही सतर्कता वाढली आहे.
ओंकार हत्तीचे बांदा शहरात आगमन; आळवाडी येथे तेरेखोल नदीकाठी वावर
