वेंगुर्ला
माजी खासदार तथा विद्यमान आमदार ना. निलेश राणे ( शिवसेना ) यांनी रेडी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रितेश राऊळ व रामसिंग राणे यांच्या हस्ते आ. निलेश राणे यांचा शाल श्रीफळ व गणेश प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सलग दुसऱ्यांदा शिक्षण व आरोग्य सभापती पद भूषविणाऱ्यारेडी गावचे सुपुत्र प्रितेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीचे निलेश राणे यांनी कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुका विकासासाठी प्रितेश राऊळ यांनी यापुढे आपले अधिकचे योगदान द्यावे, असे यावेळी निलेश राणे यांनी बोलताना सांगितले.
रेडी येथे आ. निलेश राणे यांनी घेतले प्रितेश राऊळ यांच्या गणपतीचे दर्शन
