अल्पवयीन मुलीचा अपहरण तपास वेगाने

भाजपने केले पीआयचे कौतुक

*⚡वैभववाडी ता.२०-:* अल्पवयीन युवतीचे अपहरण तपासात चांगली कामगिरी केल्याबद्दल भाजपा वैभववाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष नासीर काझी, बंड्या मांजरेकर, महिला पदाधिकारी स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, शुभांगी पवार आदी उपस्थित होत्या. इंस्टाग्रामवर ओळख पटवत अहमदनगर येथील आरोपीने तालुक्यातील युवतीचे अपहरण केले होते. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी तीन दिवसात त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. वैभववाडी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page