*⚡बांदा दि.२०-:* डेगवे गावाचे सुपुत्र आणि संगीत शिक्षक बुवा वासुदेव सखाराम देसाई यांना नुकताच गोपिकृष्ण गुरूकुल प्रा. संस्था ठाणे, आयोजित गणेशोत्सव गायन स्पर्धेत उत्कृष्ट अभंग गायनाचा बहुमान मिळाला. नुकतेच पुरस्कार ऑनलाईन आयोजित सोहळ्यात वितरित करण्यात आलेत. वासुदेव देसाई हे उत्कृष्ट भजनी कलाकार आहेत. त्यांनी आतापर्यंत डेगवे, सिंधुदुर्ग व गोव्यात शेकडोंच्या संख्येने भजने सादर केली आहेत. त्यांना त्यांच्या मातोश्री गंगाबाई देसाई आणि वडील सखाराम देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेसाठी त्यांना गुरुवर्य काका श्यामसुंदर देसाई, भाऊ विनय देसाई आणि ऋषिकेश देसाई यांची साथ लाभली. सामान्य कुटुंबातून कला सादर करत राज्यस्तरावर नावलौकिक मिळविणाऱ्या वासुदेव देसाई यांचे डेगवे आंबेखणवाडी ग्रामस्थ, मित्रमंडळी यांच्याकडून कौतुक होत आहे.
डेगवेचे वासुदेव देसाई यांना गणेशोत्सव गायन स्पर्धेत बहुमान
