कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 21.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3683.8575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 07(3619), सावंतवाडी – 16(3999.1), वेंगुर्ला – 25(2915.8) कुडाळ – 44(3567), मालवण – 12(3953.96), कणकवली – 19(4026), देवगड – 14(3179), वैभववाडी – 36(4211) पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page