त्या’ बेपत्ता तरुणाच्या शोधकार्यात दुसऱ्या दिवशीही अपयश

*⚡सावंतवाडी ता.२०-:* शहरातील एका खाजगी बँकेचे व्यवस्थापक मनोहर प्रभाकर गावडे (35) हे शनिवार रात्री पासून बेपत्ता आहेत, त्यांची इऑन गाडी ओटवणे पुलापासुन शंभर मीटरवर आढळून आल्याने आणि कारमध्ये चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामुळे त्याने नदीपात्रात आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात असुन पत्नी अपर्णा गावडे हिने पोलिसांत बेपत्ताच तक्रार दिली आहे. सावंतवाडी पोलिसांकडून शोधमोहीम सुरु असून सोमवारी सायंकाळी बाबल आल्मेडा टीमने नदीपात्रात शोध घेतला मात्र त्यात त्यांना अपयश आले आहे. मनोहर गावडे याने ओटवणे नदीमध्ये आत्महत्या केल्याच्या शक्यतेने नुसार आज सायंकाळी उशिरा बाबल अल्मेडा टीम कडून नदीपात्रामध्ये शोध घेण्यात आला मात्र दिवस मावळतीकडे आल्याने अंधुक प्रकाशामुळे ही शोधमोहीम थांबवण्यात आली, तत्पूर्वी सकाळी स्थानिक ग्रामस्थ नरेंद्र कविटकर, मंगेश भिसे, शशिकांत कविटकर, किरण गावकर, अनंत तावडे, किशोर झोळबेकर, नितीन उमळकर, पोलीस पाटील शेखर गांवकर, तसेच पोलिस कर्मचार्यांनी नदी परिसरामध्ये नदीकाठी शोध घेतला. मात्र काहीच आढळून आले नाही.

You cannot copy content of this page