*⚡सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी तालुक्यात आज ६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ० तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात आज एकही रुग्ण सापडला नसून, ग्रामीण भागात आरोस आणि कलंबिस्त येथे प्रत्येकी दोन – दोन रुग्ण सापडले असून, सावरवाड आणि न्हावेली येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ६२ रुग्ण सक्रिय आहेत.
