Headlines

Global Maharashtra Breaking News

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ४ रोजी एकदिवसीय संप

सिधुदूगनगरी- ता २२ कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अंगणवाडी सह कामगार संघटनानी ४ सप्टेंबर रोजी देशव्यापी एकदिवशीय संप आयोजीत केला आहे. तरी हा संप यशस्वी करावा असे आवाहन कमलताई परूळेकर यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशातील सर्व योजना कर्मचारी यानी देशव्यापी संप करण्याचा एच एम एस,आयटक,सीटू इंटक वगैरे केंद्रीय संघटनानी निर्णय केला…

Read More

कोरोना यौध्यांचे पुन्हा ठिय्या आंदोलन

जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करीत वेधले शासनाचे लक्ष *⚡सिंधुदुर्गनगरी ता २२-:* कोरोना महमारीच्या कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची शासनाने अचानक सेवा समाप्त करून कोरोना योध्याना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा सेवेत घ्यावे.या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प.समोर ठीय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन…

Read More

नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पण अभियान

लसीकरण केंद्राना भेटी देत सुरू आहे जनजागृती;वेंगुर्ले भाजपाचा उपक्रम *⚡वेंगुर्ले ता.२२-:* राष्ट्रीय अध्यक्ष मान जगतप्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ” सेवा आणि समर्पण अभियान ” विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरे करण्यात येणार आहे .यामध्ये लसीकरण केंद्रांना भेटी देऊन ” जनजागृती ” व…

Read More

आर्थिक बचतीसाठीच शाळा,महाविद्यालये सुरू करत नसल्याने शिक्षणाचा बट्टाबोळ

शिक्षणप्रेमी ग्रामस्थांच्या सभेत प्रा .महेंद्र नाटेकर यांचा शासनावर आरोप *⚡कणकवली ता.२२-:* शाळा – महाविद्यालये सुरू करायची झाली तर बहुसंख्य शिक्षकांच्या तात्काळ नेमणुका कराव्या लागतील . कोविड सेंटरवर पाठविलेल्या शिक्षकांना परत शाळेत बोलवावे लागेल व त्यांच्याऐवजी अन्य हजारो तरुणांच्या नेमणुका कराव्या लागतील . याला प्रचंड खर्च येणार आहे . म्हणून केवळ आर्थिक बचतीसाठी शासनाने कोरोनाची भीती…

Read More

विजय घरत यांच्यावतीने कणकवली,देवगड तालुक्यातील शाळांना मोफत वहया वाटप

*⚡कणकवली ता.२२-:* आपलो कोकण आपली जवाबदारी हे ब्रीद वाक्य ध्यानी ठेवुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महालक्ष्मी मंदिर परिसर रहिवाशी एकता संघ मुंबईचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मुंबई उपाध्यक्ष विजय घरत यानी केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे, आम. नितेश राणे, मा.खा.डाॅ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली,देवगड तालुक्यातील शाळांना मोफत वहया वाटप…

Read More

वेंगुर्लेत कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न

तालुका विधी सेवा व बार असोसिएशनचा उपक्रम *⚡वेंगुर्ले ता.२२-:* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी सामान्य नागरिकांसाठी कायदेविषयक बाबींची माहिती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वेंगुर्ला बसस्थानक येथे सकाळी १० पासून वकील व विधी स्वयंसेवकांमार्फत लिगल अॅड क्लिनिक…

Read More

भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या बॅनरवर जोडे मारून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक : वादग्रस्त वक्तव्य मागे न घेतल्यास त्यांचे थोबाड रंगविण्याचा इशारा *⚡सावंतवाडी ता.२२-:* भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने प्रविण दरेकर यांचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रविण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 421.9380 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.32 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 28.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 87.1310, अरुणा – 78.9172, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.675 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3730.5325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 29(3648), सावंतवाडी –…

Read More

सावंतवाडी गरड येथील हेळेकर मंदिराच्या पत्र्याच्या शेडवर वडाचे झाड कोसळले

शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान *⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी गरड येथील हेळेकर मंदिर येथील वडाचे झाड कोसळले असून, हे झाड मंदिराच्या वर बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच नेल्सन फेराव, हेमंत रेडकर, किरण माटेकर, अब्दूल शेख, विशाल सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली…

Read More
You cannot copy content of this page