*⚡कणकवली ता.२२-:* आपलो कोकण आपली जवाबदारी हे ब्रीद वाक्य ध्यानी ठेवुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महालक्ष्मी मंदिर परिसर रहिवाशी एकता संघ मुंबईचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मुंबई उपाध्यक्ष विजय घरत यानी केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे, आम. नितेश राणे, मा.खा.डाॅ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली,देवगड तालुक्यातील शाळांना मोफत वहया वाटप केले. दरम्यान कणकवली व देवगड तालुक्यातील वरवडे,कासार्डे केंद्रातील केंद्रनाळा नं.१, देऊलकरवाडी, तांबळवाडी , बंडवाडी,जांभुळवाडी , ब्राम्हणवाडी , दाबवाडी, नागसावंतवाडी, साटमवाडी ओझरम मापारवाडी,फणसगाव , शाळीस्ते शाळा क्रं. १- २, शिडवणे १-२ , कुरंगवणे येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी विविध ठिकाणी कणकवली पं. स. उपसभापती प्रकाश पारकर , जि. प. सदस्य तथा मा. बांधकाम सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार , उद्योजक महेश उर्फ बंड्या नारकर,बाबु आडिवरेकर ,अनंत आडिवरेकर, उपसरपंच उदय पाटील , कोकाटे सर ,महेश पडवळ , सचिन राणे , गणेश पाताडे , बाळु पाताडे , अनिल घाडिगावकर , सरपंच सोनु सावंत , वारगावचे उपसरपंच नाना शेट्ये , प्रमोद उर्फ गोटया पांगेरकर, इरफान मुल्ला , विकास कुळकर्णी , संदेश नर , संतोष वायगणकर, निकेत पावसकर आदी उपस्थित होते. यावेळी दोन्ही तालुक्यातील सरपंच , उपसरपंच , मुख्याध्यापक , केंद्र प्रमुख , पालक वर्ग उपस्थित राहत या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिमीयर रोडवेज, शांती फांऊडेशन, दिक्षिता ट्रव्हल्स याच्यासह स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल श्री. घरत यानी आभार व्यक्त केले. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून जिल्ह्यातील तिथवली ( वैभववाडी ) , कासार्डे (कणकवली) ,मसदे -चुनवरे ( मालवण) येथील प्रथमिक आरोग्य केंद्राना वातानुकुलीत शवपेटीका प्रदान करणार असल्याचे श्री. विजय घरत यानी सांगितले
विजय घरत यांच्यावतीने कणकवली,देवगड तालुक्यातील शाळांना मोफत वहया वाटप
