सावंतवाडी गरड येथील हेळेकर मंदिराच्या पत्र्याच्या शेडवर वडाचे झाड कोसळले

शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी गरड येथील हेळेकर मंदिर येथील वडाचे झाड कोसळले असून, हे झाड मंदिराच्या वर बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच नेल्सन फेराव, हेमंत रेडकर, किरण माटेकर, अब्दूल शेख, विशाल सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

You cannot copy content of this page