नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पण अभियान

लसीकरण केंद्राना भेटी देत सुरू आहे जनजागृती;वेंगुर्ले भाजपाचा उपक्रम

*⚡वेंगुर्ले ता.२२-:* राष्ट्रीय अध्यक्ष मान जगतप्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ” सेवा आणि समर्पण अभियान ” विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरे करण्यात येणार आहे .यामध्ये लसीकरण केंद्रांना भेटी देऊन ” जनजागृती ” व ” सेवाकार्य ” करण्यात येणार आहे . वेंगुर्ले भाजपा च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय , वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत या दोन ठिकाणी लसीकरण केंद्रावर भेट देऊन रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी व सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी व लसीकरणात सहभागी नागरिकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले . यावेळी संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी यांनी जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान मोदी सरकारच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले . तसेच आतापर्यंत देशातील ७० कोटी जनतेचे लसीकरण झाल्याचे सांगितले .त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २ कोटी जनतेचे लसीकरण होणार अशी माहिती दिली . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , रविंद्र शिरसाठ , ज्ञानेश्वर केळजी , विजय बागकर , रुपेश राणे , महादेव नाईक , सुधीर गावडे , युवा मोर्चा चे समीर नाईक , अनील तेंडोलकर , राघोबा गावडे , राहुल परब इत्यादी उपस्थित होते .

You cannot copy content of this page