Headlines

Global Maharashtra Breaking News

महाराष्ट्र भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट संयोजक व सहयोग संयोजक जाहीर

निलेश तेंडुलकर यांच्यावर कोकणची जबाबदारी कुडाळ : भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट प्रभारी श्री कैलास वर्मा यांनी रेल्वे प्रवासी प्रकाश संयोजक व संयोजक पदाची घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यामध्ये कोकण विभागाचे रेल्वे प्रकोष्ट सहसंयोजक म्हणून निलेश तेंडुलकर सिंधुदुर्ग यांना संधी देण्यात आली आहे. ही घोषणा आज भारतीय जनता पार्टी…

Read Full News

वेंगुर्ला शहरात पोलिसांचे वाहतुकीचे योग्य नियोजन……

वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्यामार्फत श्री गणेशोत्सव कालावधीत योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतीत चाकरमानी तसेच ग्रामीण भागातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी बाराव्या दिनी आल्याने बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जन अकराव्या व बाराव्या दिनी होणार असल्याने भक्तगणातून आनंद व्यक्त होत आहे. पाच दिवसांनी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर शनिवारपासून गेल्या तीन…

Read Full News

मालवण नगरपालिकेच्या ताब्यातील गोवंशाच्या देखभालीत गंभीर निष्काळजीपणा

मनसेकडून चौकशीची मागणी मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गोवंशाच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील एका गायीने वासराला जन्म दिल्यानंतर योग्य अन्न-पाणी व आवश्यक काळजीच्या अभावामुळे वासराचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संबंधित गायीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला असून याबाबत…

Read Full News

जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त मालवण ग्रामीण रुग्णालयात २३ रोजी आयुष शिबिर

मालवण दि प्रतिनिधी जागतिक आयुर्वेद दिन व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, मालवण येथील आयुष कक्षाच्या वतीने बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आयुष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आयुर्वेदीय व होमिओपॅथी तपासणी तसेच औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. संधिवात, सांधेदुखी व गुडघेदुखी, पाठदुखी,…

Read Full News

सावंतवाडीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालकमंत्री ना. नितेश राणेंची भेट

श्री गणरायाची विधिवत पूजा व आरती करून घेतले दर्शन सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सावंतवाडी तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध मंडळांमध्ये विधिवत पूजा करून गणरायाची आरती केली. सावंतवाडी शहरातील चितारआळी, सावंतवाडी पोलीस ठाणे, सालईवाडा…

Read Full News

हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’…

सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती:महिलांसाठी रंगला खेळ झी मराठीचा.. ⚡कणकवली ता.२१-: तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावात आईनतळवाडी, भवानी मंदिर परिसरात ‘झी मराठी’ चा मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या निमंत्रणातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परिसरातील रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त…

Read Full News

असलदे येथील प्रतीक वाळके कुटुंबीयांचे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांनी केले सांत्वन

वडाचे झाड अंगावर पडून प्रतीक वाळके याचा झाला मृत्यू कणकवली : नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने रस्त्यालगतची अनेक झाडे तोडली आहेत. मात्र असलदे येथील वडाचे जुने आणि धोकादायक स्थितीत असलेले झाड ठेकेदाराने तोडले नसल्याने १५ सप्टेंबर रोजी या मार्गावरून दुचाकीने जाणाऱ्या प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) याच्या दुचाकीवर ते वडाचे…

Read Full News

पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा; बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाचे नियोजन

सिंधुदुर्ग, दि. २१ : जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. काही भागात भातपीक करपण्याच्या घटना निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत व उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा…

Read Full News

सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपीच्या लेकींची फुगडी ठरतेय लक्षवेधी…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पारंपरिक लोककलेचा जागर; गावासह आजूबाजूच्या परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡बांदा ता.२१-: सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात सादर केलेली पारंपरिक फुगडी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुंदर संगम या फुगडी नृत्यातून अनुभवायला मिळत आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेत…

Read Full News

बांद्याचा बाप्पा ठरला ‘नंबर वन’; न्यूज १८ मराठीच्या स्पर्धेत सिंधुदुर्गातून प्रथम…

⚡बांदा ता.२१-: न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ मध्ये बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव गांधीचौक मंडळाच्या ‘बांद्याचा बाप्पा’ या गणेशोत्सव मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. सर्वाधिक मते मिळवत ‘बांद्याचा बाप्पा’ विजेता ठरला असून, मंडळाला प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली…

Read Full News

You cannot copy content of this page