महाराष्ट्राचे मास्टर शेफ ऑनलाईन रेसिपी स्पर्धेत कणकवलीच्या आरती वायंगणकर द्वितीय
मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या ऑनलाईन रेसिपी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कलमठ येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सौ. आरती मकरंद वायंगणकर- कांबळी यांच्या कोकणातील रस खापरोळी रेसिपीला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आरती वायंगणकर यांना मुख्यमंत्री…
