माजी नगरसेवक विजय चव्हाण – गावकर यांचे अल्पशा आजाराने निधन

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे माजी नगरसेवक तसेच मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक आणि मालवण देऊळवाडा येथील रहिवासी विजय कृष्णाजी चव्हाण – गावकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. आंबा व्यावसायिक असणारे विजय चव्हाण-गावकर यांनी मालवण खरेदी विक्री संघात ४० वर्षे व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली होती. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या जडणघडणीत श्री. विजय चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. मालवण नगरपालिकेचे ते काहीकाळ नगरसेवक होते. या काळात त्यांनी शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली. गेले काही दिवस ते आजारी होते. मालवण देऊळवाडा येथील स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण वायरी येथील आंबा व्यावसायिक संजय नरें आणि प्रा महेंद्र कविटकर यांचे ते सासरे होत

You cannot copy content of this page