व्यावसायीक गाड्यांचे थकीत रोड टँक्सवरील व्याज व दंड व्याज माफ करा

नाम.सतेज पाटील यांचे प्रदिप मांजरेकर यांनी वेधले लक्ष

*⚡कणकवली ता.२८-:* व्यावसायीक गाड्यांचे थकीत रोड टँक्सवरील व्याज व दंड व्याज माफ करा अशी मागणी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी नाम. सतेज पाटील यांची ओरोस येथे भेट घेवुन व्यावसायीक गाड्यांवरचे थकीत रोड टँक्स वरील व्याज व दंडव्याज माफ करण्याची मागणी केली.सध्या 2 वर्ष कोविड काळ व त्या आधी माल वाहतुक व्यवसायावरील मंदी मुळे काही वाहने बंद आहेत परंतु नाँनेज न केल्यामुळे सदर वाहनांवरील रोड टँक्स वरील व्याज व दंड व्याज हे रोड टँक्स पेक्षा कितीतरी अधिक आहे.जर ते माफ करुन फक्त रोड टँक्स भरुन वाहन परवाने दिल्यास व्यावसायीकांना दिलासा मिळेल. यावेळी सदर विषय हा पुर्ण महाराष्ट्रा विषयी असुन यावर लवकरच योग्य निर्णय घेऊन व्यावसायीकांना दिलासा मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करु असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले असल्याचे प्रदीप मांजरेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page