Global Maharashtra Breaking News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला 10 लिटरचे ऑक्सीजन कॉन्संट्रेटर भेट

दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशनचा उपक्रम *💫कणकवली दि ०२-:* दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशन यांच्या सौजन्याने येथील उपजिल्हा रुग्णालयाला 10 लिटर क्षमतेचे ऑक्सीजन कॉन्संट्रेटर देण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांद शिकलगार यांच्याकडे कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या समस्यांबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक कार्यकर्ते महेश…

Read More

कृषी विषयक विकासासाठी सिंचन क्षेत्र वाढणे आवश्यक

मनोज रावराणे;लोरे नं. १ येथे कणकवली तालुकास्तरीय कृषीदिन मेळावा *💫कणकवली दि.०१-:* कणकवली तालुक्यातील कृषी विषयक विकास होण्यासाठी सिंचनासाठी शेत्र वाढणे आवश्यक असून त्यासाठी घोणसरी प्रकल्पाचे पोट कॅनॉल काढण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन मेळावा ग्रामपंचायत लोरे नं. १ येथिल सभागृहात…

Read More

स्वतःचे हित पाहणाऱ्या खास. विनायक राऊत यांचा झाला पर्दाफाश

माजी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांचा टोला *💫कणकवली दि.०१-:* मुंबई-गोवा महामार्गावर अनेक कामे अपुरी असल्याने टोलची अंमलबजावणी करू नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे करणार्‍या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांचा खरा चेहरा समोर आला आहे. कारण स्वतःच्या मुलाच्या नावाने टोल वसुलीसाठी कंपनी तयार करून आपल्या मुलाच्या रोजगाराचा विचार करणारे या मतदारसंघाचे…

Read More

ओव्हरटेक करण्यास न दिल्याने सांगलीतील तिघाना मारहाण

एक गंभीर:बुधवार रात्रीची घटना:सावंतवाडीतील तिघांवर गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.०१ प्रसन्न गोंदावळे-:* ओव्हरटेक करण्यास साईड न दिल्याच्या रागातून सांगली येथील तिघांना सावंतवाडीतील तीन अज्ञात युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत सांगलीतील एक गंभीर जख्मी झाला असून, त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांना देखील…

Read More

कुशेवाडा ग्राम पंचायतला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार बहाल

२०१७-१८ मध्ये स्वच्छ्ता अभियानात मिळविला होता राज्यात तृतीय क्रमांक *💫ओरोस दि.०१-:* आपल्या महाराष्ट्रला संताची परपंरा आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे. हेच स्वच्छतेचे कार्य पुढे नेण्याचे काम सरकारच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. जेथे जिद्द व निश्चय असतो तेथे यश नक्की मिळते त्यामुळेच हागणदारी मुक्त महाराष्ट्राप्रमाणे कोरोना मुक्त महाराष्ट्र नक्की होईल,…

Read More

*आंबोली मुख्य धबधब्याजवळ मोठा दगड कोसळला*

*💫आंबोली दि.०१-:* आंबोली घाटात आज सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान मुख्य धबधब्याजवळ एक भला मोठा दगड खाली कोसळला आहे. परंतु, सुदैवाने यावेळी पर्यटन बंद असल्याने मोठा अपघात घडला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेली २ वर्ष कोणतेही काम न केल्याने, हा अपघात घडला असून, या अपघाताला बांधकाम विभागानेच आमंत्रण दिले आहे. असा आरोप आंबोली ग्रामपंचायतीने केला आहे….

Read More

जाणवली येथील कल्पना श्रीरंग प्रभू यांचे निधन

*💫कणकवली दि.०१-:* कणकवली तालुक्यातील जाणवली येथील रहिवाशी व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आरोग्यसेविका सौ .कल्पना श्रीरंग प्रभू (55, पूर्वाश्रमीच्या कल्पना सामंत) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जाणवली येथील पशु सर्वचिकित्सालयातील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीरंग प्रभू यांच्या त्या पत्नी होत. तर सांडवे हायस्कूल येथील शिक्षक संजय सामंत यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा…

Read More

एस. टी. च्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अपेक्षित प्रवासांची वानवा

स्थानिक फेऱ्या सुरू करण्याची मागणी *💫कणकवली दि.०१-:* सिंधुदुर्ग राज्य परिवहन विभागाने २८ जूनपासून सुरु केलेल्या लांब पल्ल्याच्या एस. टी. च्या फेऱ्याना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागातील फेर्यां अद्याप सुरू नसल्याने खेड्यापाड्यांतील जनतेची मोठी गैरसोय होत आहे. या फेऱ्या त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी कोल्हापूर, पुणे गाड्यांना जेमतेम प्रवासी…

Read More

रोटरी क्लब मालवण कडून डॉक्टरांचा करण्यात आला सन्मान

मालवण (प्रतिनिधी) डॉक्टर्स डे चे औचित्य साधुन राेटरी क्लब मालवण तर्फे मालवण मधील डॉक्टरांचा यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रशांत पवार, डॉ. अविनाश झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. दर्शन खानोलकर यांना रोटरीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर, नूतन सचिव रतन पांगे, माजी अध्यक्ष ऍड….

Read More

भाजप शहर महिला मंडल कडून डॉ. पाटील आणि डॉ दुर्भाटकर यांचा सन्मान

*डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने करण्यात आला सन्मान* *💫सावंतवाडी दि.०१-:* आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी शहर भाजप महिला मंडलच्या माध्यमातून शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पाटील आणि डॉ. दुर्भाटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सद्य कठीण परिस्थितीत डॉक्टर हे जनतेसाठी देव…

Read More
You cannot copy content of this page