बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली प्रशालेची विद्यार्थिनी जिया साऊळ हिला शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…

कणकवली – बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली येथील विद्यार्थिनी कु. जिया ज्ञानदेव साऊळ हिने इयत्ता ८वी पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) – 2025 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

तिने एकूण २९६ पैकी १९६ गुण मिळवत ६६.२२ टक्के गुण प्राप्त केले असून तिची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. जियाने परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशामुळे शाळेचा, शिक्षकांचा आणि पालकांचा अभिमान वाढला असून शाळेच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच संस्थेचे सेक्रेटरी सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, संचालक संदीप सावंत शिक्षण समन्वयक प्रणाली सावंत यांनी जियाचे अभिनंदन करत तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जियाचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संपूर्ण शाळा परिवाराकडून शुभेच्छा!

You cannot copy content of this page