Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकिलवाडा भागात एकच रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात माजगाव १, ओटवणे १, तीरोडा २, सांगेली ३, दांडेली १ असे रुग्ण…

Read More

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सभेत अभिनंदनाच्या ठरावा व्यतिरिक्त कोणतेही ठराव नाहीत *💫वेंगुर्ला दि.२३- :* वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाली. या सभेत अभिनंदनाच्या ठरावा व्यतिरिक्त कोणतेही ठराव किंवा महत्वाच्या सूचना झाल्या नाहीत. काही सदस्यांना ऑनलाईन काहीच ऐकू येत नसल्याने त्यांना सूचना मांडता आल्या नाहीत. त्याबद्दल सदस्यांनी…

Read More

नाटळ पुलाच्या बांधकामाला मे महिना उजाडणार

पालकमंत्र्यांची सूचना;सतीश सावंत यांनी पर्यायी व्यवस्थेची पाहणी केली *💫कणकवली दि.२३-:* कनेडी बाजारपेटेपासून जवळच असलेल्या नाटळ मल्हारी पुलाचे पुर्न बांधकाम करण्यासाठी तब्बल दहा महिने म्हणजे मे महिन्या पर्यंतचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि अत्यावश्यक सेवेसाठी कनेडी परिसरात येणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था निर्माण करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा…

Read More

*माडखोल धवडकी येथील नुकसानग्रस्त भागाला जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली भेट

नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत केली पाहणी* *💫सावंतवाडी दि.२३-:* माडखोल धवडकी येथे पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सायंकाळी केली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब व शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सावंतवाडी तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरशिंगे नदीला पूर आल्याने माडखोल, धवडकी…

Read More

शहरातील हार्डवेअर दुकानातील चोरीप्रकरणी संशयिताची जामिनावर मुक्तता

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी शहरातील हार्डवेअर दुकानात झालेल्या चोरीच्या तपासासाठी अटकेत असलेला संशयित आरोपी विनोद परशुराम घणके (३०, सध्या रा. कोलगाव,मूळ रा. सांगली) याची सावंतवाडी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. सालईवाडा येथील हार्डवेअर दुकानातील चोरीच्या तपासासाठी सावंतवाडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने संशयित आरोपीची…

Read More

स्वत:चे घर संकटात असतानाही दिगवळे येथे जात गोट्या सावंत धावले मदतीला

*💫कणकवली दि.२३-:* दिगवळे रांजणवाडी येथे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या जाधव यांच्या घरावर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी रांजणवाडी येथे धाव घेतली आणि गावातील युवकांच्या मदतीने माती बाजूला काढून एका जखमी व्यक्तीस बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. सावंत यांंनी दाखवेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे…

Read More

मळगाव ग्रामपंचायतमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी

*💫सावंतवाडी ता.२३-:* मळगाव ग्रामपंचायतमध्ये आज लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी सरपंच तेजपाल सावळ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Read More

अतिवृष्टीचा भुईबावडा घाटाला फटका

*घाट मार्गात अगोदरच असलेली ‘ती’ भेग अधिकच झाली रुंद *💫वैभववाडी दि.२३-:* तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाचा चांगलाच फटका भुईबावडा घाटाला बसला आहे. घाटाचा धोका अधिकच वाढला आहे. घाट मार्गात तब्बल शंभर मीटर अंतरात असलेली ती भेग खुपच रुंद झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा घाट खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भुईबावडा घाट मार्गात पावसाला सुरुवात झाल्यापासून…

Read More

अतिवृष्टीमुळे हेत मौंदे मार्गावरील वाहतूक ठप्प

*💫वैभववाडी दि.२३-:* तालुक्यात बुधवारी व गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे हेत मौंदे मार्गावर अनेक ठिकाणी दरडी पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भोम, मौंदे, आखवणे गुरववाडीचा संपर्क तुटला आहे. हेत मौंदे मूळ रस्ता अरुणा धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे.गेले काही दिवस तालुक्यात अतिवृष्टी होत आहे.या अतिवृष्टीमुळे गुरुवारी राञी या…

Read More

वेंगुर्ले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने फेसमास्क शिल्ड वाटप

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यवान साटेलकर व नितीन कुबल यांच्या हस्ते वाटप *💫वेंगुर्ले दि.२३-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे तलाठी व सर्कल, वेंगुर्ले शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने फेसमास्क शिल्ड वाटप शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर व माजी जिल्हा बॅंक संचालक नितीन कुबल यांच्या हस्ते…

Read More
You cannot copy content of this page