इंदिरा गांधी जयंती निमित्त काँग्रेस कणकवलीच्यावतीने वकृत्व स्पर्धा

*⚡कणकवली ता.०३-:* इंदिरा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय काँग्रेस कणकवलीच्यावतीने वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत खाली नमूद केलेल्या विषयांवरती भाषणाचा चार ते पाच मिनिटांचा व्हिडिओ करून तो खालील लिंक वर अपलोड करावा. व्हिडिओ करत असताना स्वतःची ओळख करून देऊन आणि स्वतःचा मोबाईल नंबर सांगून नंतर स्वतः कॅमेरा समोर उभे राहून व्हिडिओ करावा. कृपया स्वतःचा नंबर आणि नाव नमूद करण्यास विसरू नये. विजेत्यांची नावे १९ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. यांना खालीलप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. फेसबुकवर मिळालेल्या लाईक्स वरती विजेत्यांची निवड केली जाईल. पहिले बक्षीस-१०००रु. आणि सन्मानचिन्ह, दुसरे बक्षीस-७००रु. आणि सन्मानचिन्ह, तिसरे बक्षीस-५००रु. आणि सन्मान चिन्ह असे असणार आहे. स्पर्धेचे विषय:- इंदिराजींचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, इंदिराजींचा राजकीय प्रवास, इंदिराजींची पंतप्रधानपदाची कारकीर्द. सदर विषयांवरील त्यांचा व्हिडिओ करून https:// www.facebook.com/profile.php?id=100052643560641 या लिंक वर अपलोड करावा. सदर लिंक ही फेसबुक वर राष्ट्रीय काँग्रेस कणकवली या नावाने उपलब्ध आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक मिळतील तो स्पर्धक विजेता म्हणून घोषित केला जाईल. आणि स्पर्धकांना १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलावण्यात येईल. आणि त्यांना आपले भाषण प्रदर्शीत करण्याची संधी दिली जाईल. व्हिडिओ अपलोड करत असताना कोणतीही अडचण आल्यास खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुमचा व्हिडिओ व्हाट्सअप करावा. असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ९४२२४३६८८०, शहराध्यक्ष महेश तेली ८५३०६०६७४८ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page