अन्यथा लोबो यांना शहरात फिरू देणार नाही…

स्वराज्य संघटनेचा इशारा; छत्रपती शिवाजी महाराज यांचा केला होता ऐकेरी उल्लेख

*⚡सावंतवाडी ता.०३-:* छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून, सावंतवाडी नगरपालिकेच्या विरोधी नगरसेविका तथा गटनेत्या आनारोजिन लोबो यांनी ऐकेरी उल्लेख करून अपमान केला आहे. येत्या 48 तासात लोबो यांनी सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अन्यथा स्वराज्य संघटना त्यांना यापुढे शहरात फिरू देणार नाही. असा इशारा स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी अनिल केसरकर यांनी दिला आहे.

यावेळी अँड. अतुल केसरकर, अँड. राजू कासकर, अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, महेश पांचाळ, कृष्णा धुळपनवर, अजित सांगेलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page