दिपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला भाजपातर्फे दीपावली सणाचे औचित्य साधून दि.४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘दीपज्योति नमोस्तुते‘ वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१चे आयोजन करण्यात आले आहे. दि.४ रोजी रामेश्वर मंदिर प्रांगणात सायं. ५ वा. इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा होणार आहे. वेंगुर्ला-कॅम्प येथील त्रिवेणी संगम उद्यान येथे दि.७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘एक पणती प्रकाशाची‘ हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दि.७ रोजी सायं.७ वा. अनिता करावके यंचा गीतगायन, फनीगेम्स, मिमिक्री आणि धम्माल मस्तीचा कार्यक्रम होणार आहे. दि.८ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनृत्य, समईनृत्य व पारंपरिक नृत्याचे कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यातील नामवंत संघांचे बहारदार नृत्ये होणार आहेत. स्थानिकांनी यात सहभागी होण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात संफ साधावा. दि. ९ रोजी सायंकाळी ७ वा. सद्गुरु संगीत विद्यालय, सावंतवाडी प्रस्तुत अभंग, भक्तीगीत व चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या संपूर्ण महोत्सवात वेंगुर्ल्यातील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई व तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page