*⚡वेंगुर्ला ता.०३-:* नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत कुडाळ येथील विष्णूप्रसाद सावंत यांनी तर खुल्या स्लोगन लेखन स्पर्धेत वेंगुर्ल्याच्या योगिता नवार यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ.एम.बी. चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी एकात्मिक महिला व बालविकास योजना विस्तार अधिकारी जयेश राऊळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष नाना राऊळ, वैभवी सोकटे, गणेश सावंत, सागर सावंत, सदाशिव सावंत, निखिल ढोले, किरण राऊळ, रोहन राऊळ, अक्षता गावडे, यशवंत राऊळ आदी उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम – विष्णूप्रसाद सावंत (कुडाळ), द्वितीय-तुकाराम गोसावी (रेडी), तृतीय-पूर्वा चांदरकर ( सावंतवाडी), उत्तेजनार्थ- विजेता आईर (कुडाळ), सुजल परब (सावंतवाडी). परीक्षण कलातज्ज्ञ स्वप्नांजली गावडे यांनी केले. स्लोगन स्पर्धेमध्ये प्रथम – योगिता नवार (वेंगुर्ला), द्वितीय- धनश्री भोवर (पुणे), तृतीय- आराधना साटम (कणकवली), उत्तेजनार्थ-लविना डिसोझा (वेंगुर्ला), माधुरी खराडे (कुडाळ). विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रा. सचिन परुळकर यांनी सूत्रसंचालन तर गुरुदास तिरोडकर यांनी आभार मानले.
चित्रकला स्पर्धेत विष्णूप्रसाद तर स्लोगन स्पर्धेत योगिता प्रथम
