तुतारी एक्स्प्रेसखाली झोकून देत जीवन संपविले
कणकवली 26 जुलै सावंतवाडीहुन दादरला जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसखाली अज्ञाताने आत्महत्या केल्याची घटना कणकवली रेल्वे स्थानकात आज सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी घडली. तुतारी एक्सप्रेस सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कणकवली रेल्वे स्थानकात आली. इंजिनपासून तिसऱ्या डब्यातील पुरुष दरवाजातून खाली उतरला. रेल्वेतून उतरल्यानंतर तो इसम तुतारी एक्सप्रेसखालीच रेल्वे ट्रॅकवर झोपून राहिला. दरम्यान मालगाडी पास झाल्यानंतर तुतारी…
