*⚡मालवण ता.०८-:* युवासेना मालवण शहरप्रमुख पदी मंदार ओरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेवतळे युवा सेना शाखा प्रमुखपदी सिद्धेश मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग युवासेना प्रमुख मंदार शिरसाट यांनी मालवण शिवसेना शाखा येथे ही नियुक्ती जाहीर केली. मालवण शिवसेना शाखा कार्यालय येथे युवा सेना पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकप्रमुख अमित भोगले, तपस्वी मयेकर यासह अन्य युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. मंदार ओरसकर हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील कब्बडी खेळाडू, पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल इंजिनिअरिंग कॉलेज जीवनात स्पोर्ट्स जनरल सेक्रेटरी अशा जबाबदरी यशस्वी पार पाडत मंदार यांनी बॅचलर ऑफ इंजिनियरिंग सिव्हिल व त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केले. एक हुशार, अभ्यासु व उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी मंदार यांची ओळख आहे. मंदार यांचा तरुण वर्गाशी असलेला दांडगा संपर्क आणि नेतृत्वगुण पाहता युवासेना मालवण शहरप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, चंदू खोबरेकर, आतू फर्नांडिस, अनंत पाटकर यासह अन्य उपस्थित पदाधिकारी यांनी मंदार ओरसकर व सिद्धेश मांजरेजर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ज्युनिअर कॉलेज तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, इंजिनियर कॉलेज मधील विद्यार्थी यांच्या समस्या सोडवणे. त्यांना शैक्षणिक तसेच क्रीडा व कला क्षेत्रात प्रोत्साहन देणे, सोयी, सुविधा निर्माण करणे आदी विषयात आपण प्राधान्याने काम करणार आहोत, असे मंदार ओरसकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
युवासेना मालवण शहरप्रमुखपदी मंदार ओरसकर यांची नियुक्ती
