वाळू उपशामुळे कर्ली खाडीत उधाण वाढले

अवैद्य वाळू उत्खनन रोखा;सदानंद गोरे यांचे तहसीलदारांना निवेदन

मालवण (प्रतिनिधी) कर्ली खाडी पात्रातील निसर्गनिर्मित बेटे व खारबंधाऱ्यानजीक तसेच उमेद योजनेंतर्गत मत्स्यपालन हा व्यवसाय व तसेच शेती आहे. वाळू काढून खोली वाढल्याने उधाण वाढले आहे. शेती व माड बागायतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आंबेरी वाकवाडी येथील ग्रामस्थ सदानंद गोपाळ गोरे यांनी मालवण तहसीलदारांना दिले आहे. कर्ली पात्रात टेंडर सुरू नसतानाही अनधिकृत वाळू वाहतूक जोरात सुरू आहे. रात्रीच्या वेळी डंपर वाहतूक होत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत वारंवार पत्र देऊनही शासकीय अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये परप्रांतीय कामगारांची नोंद केली जात नाही. रॅम्प तोडून काही फरक पडणार नाही. त्याऐवजी होडीवर घाव घालणे आवश्यक आहे, असे गोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page