*⚡मालवण ता.०८-:* कोरोना वरील उपचराबाबत मिथिलीन ब्ल्यू या औषधावर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संशोधन प्रबंधाला “अमेरीकन सोसायटी ऑफ टॉपिकल सायन्स मेडीसीन ॲन्ड हायजिन सोसायटीने मान्यता दिली असल्याची माहिती रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गुजरात येथील शास्त्रज्ञ डॉ. दिपक गोळवलकर ह्यांनी भारतात पहिल्यांदा मिथीलीन ब्ल्यु ह्या औषधाचा उपयोग सौम्य व पहिल्या स्टेजवरच्या कोव्हिडं रुग्णांसाठी सर्वप्रथम केला. एम. डी. डॉ. च्या भारतातील दोनशे डॉक्टरनी एक “संशोधन ग्रुप” स्थापन करुन त्याचा उपयोग आपल्या पेशंटसाठी सुरू केला. सदर उपचार पद्धतीचा उपयोग को रोना टाळण्यासाठी झालाच ,शिवाय ए.आर.डी.एस. न्युमोनिया झालेल्या बऱ्याच पेशंटना सलाईन मधून हे औषध दिल्याने त्यांचे प्राण वाचले गेले. मालवण येथील रुग्णालयात सदर उपचार पद्धती मुळे गेल्या नव्वद दिवसा मध्ये एकही कोव्हीड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मिथीलीन ब्ल्यु उपचार पद्धतीचा गव्हर्नमेंट प्रोटोकॉल मध्ये समावेश करण्यासाठी गुजरात येथील डॉ.दीपक गोलवलवकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची, तर सदरच्या संशोधनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. विवेक रेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील आरोग्यमंत्र्यांची याबाबत भेट घेतली होती. त्यांनी आश्वासन दिले आणि ‘टास्क फोर्स कडे’ बोट दाखवत “ Emergency Use Permission साठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले. रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवण ,गोवा आणि दिनानाथ मंगेशकर ,पुणे हॉस्पिटलने I. C. U. तील अतिगंभीर रुग्णांवर मिथिलीन ब्ल्यू चा उपयोग केला. तो फार मोठया प्रमाणात यशस्वी झाला. त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय जनरलने याबद्दल व्यापक प्रसिध्दी दिली. मिथिलीन ब्ल्युच्या वापर आणि उपयोग बद्दल आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची आवश्यकता होती. डॉ. विवेक रेडकर यांनी यासंदर्भात केलेले संशोधन आता अमेरिकेत स्वीकृत झाल्याने हे सुध्दा आता साध्य झाले आहे. सन १९०३ साली औषध वापर आणि संशोधनासाठी स्थापन झालेली अमेरिकेतील ‘अमेरिकन सोसायटी ऑफ टॉपिकल मेडिसिन आणि हायजिन सोसायटी यांनी “मिथिलीन ब्ल्यु”सदर औषधास मान्यता दिली आहे. सदरची संस्था क्रिटिकल केयर फोरम मधील जगातील पियर रिव्ह्यू रिसर्च ला मान्यता देणारी जगातील पहिल्या तीन विश्वासू संस्था पैकी एक आहे, अशी माहिती रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील लसीकरण व आजारामुळे आलेल्या हर्ड इम्युनिटीमुळे सुदैवाने तिसरी लाट व मृत्युंदर अत्यंत कमी झाले. तरी देखील ब्लडप्रेशर, मधुमेह विकार,ज्येष्ठ नागरिक तसेच कोमॉरबीड पेशंटमध्ये ही लाट चालूच आहे. त्यामुळे मिथिलीन ब्ल्यु” ह्या औषधाचा उपयोग, लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोव्हीड होऊ नये म्हणून चालू ठेवणे आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या हयुमिडीफायर मध्ये हे औषध मिसळल्याने म्युकर मायकोसिसची साथही आटोक्यात आली आहे. कोविड पेशंटच्या रक्तातील ‘ मिथ हिमोग्लोबीन’ किती असते. त्यामुळे Oxygen ची पातळी कमी होते ह्याचे संशोधन देखील कृष्णा मेडीकल कॉलेजच्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट मध्ये चालू आहे. डॉ. अजित सोनटक्के व डॉ. विवेक रेडकर त्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. ही पातळी कळल्यास ह्या औषधाला टास्क फोर्सच्या मान्यतेची गरज भासणार नाही. त्यावरही गेलॉर्ड, अमेरिका येथे होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये मालवण व कृष्णा मेडीकल कॉलेज येथे ट्रीटमेंट घेतलेल्या पेशंटवरील हा संशोधन प्रबंध डॉ. विवेक रेडकर ह्यांनी ३० ऑक्टोबर रोजी दृक्श्राव्य माध्यमातून सादर केला. संबधित प्रबंध लवकरच ASTMH या जगप्रसिद्ध वैद्यकीय जनरल मधून जगभरात प्रसिध्द होईल, असेही तोरसकर यांनी म्हटले आहे. सदरच्या संशोधनाला मदत करणारे डॉ. गोलवलकर, डॉ. शिंदे, डॉ. सोनटक्के, डॉ. इनामदार, डॉ. सागर रेडकर, कृष्णा मेडिकल I. C. U Covid Department चे डॉ. अपर्णा पतंगे RHRC चे . डॉ दर्शन खानोलकर, डॉ. मोहन जगताप व RHRC स्टाफचे डॉ. विवेक रेडकर यांनी आभार मानले आहेत. तसेच सिंधुदुर्गात हजारो लोकांपर्यंत मिथिलीन ब्ल्यु”औषधाचा वापर, त्याचा उपयोग याबद्दल जनजागृती करणारे आणि त्यांच्या पर्यंत पोचवणारे मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ता सामंत,अंगणवाडी सेविका साठी काम करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीम.कमलताई परुळेकर आणि मुंबई च्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांचे देखील आभार मानले आहेत. भारतातील सुमारे दोनशे तज्ञ डॉक्टरनी सुचविलेले आणि रेडकर हॉस्पिटलमध्ये रिसर्च सेंटर ने संशोधित मिथिलीन ब्ल्यु उपचार पद्धतीसबंधीत संशोधन प्रबंधाला अमेरीकन टॉपिकल मेडीसीन ॲन्ड हायजिन शास्त्रज्ञांची मान्यता मिळाल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी भारतातही त्याचा वापर अधिकृत करण्या संदर्भात केंद्र व राज्य सरकार काय पाऊल उ
अमेरिकन सोसायटी ऑफ टॉपिकल सायन्स मेडिकल अँड हायजीनची परवानगी;रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने केले आहे संशोधन
