ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीच्या कार्यकारी मंडळात अशोक परब व महादेव वसकर यांची निवड…

परब स्वीकृत सदस्य तर वसकर उपाध्यक्षपदी; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्याला सदस्यांकडून एकमुखी पाठिंबा..

⚡बांदा ता.११-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशीच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या उर्वरित कालावधीसाठी अशोक परब यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली, तर संस्थेचे ज्येष्ठ व क्रियाशील कार्यकर्ते महादेव वसकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही निवडींना एकमुखी पाठिंबा दर्शविला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी उपस्थित सदस्यांनी श्री परब व श्री वसकर यांनी सामाजिक, संघटनात्मक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविणे आणि समाजातील ज्येष्ठांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे यासाठी नवनियुक्त पदाधिकारी सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीच्या शेवटी सर्व सदस्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
फोटो:-
बांदा येथे नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page