Headlines

Global Maharashtra Breaking News

नमसवाडी ब्राह्मण जत्रा २२ नोव्हेंबर रोजी

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मणाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवार दि. २२ नोव्हेंबर संपन्न होत असून यानिमित्त सकाळपासून केळी, नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Read More

बॅ.खर्डेकरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राचार्य विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी कॉलेजला दिलेल्या कॉम्प्युटर लॅबचा उल्लेख करीत त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सुनिल सौदागर, श्रीनिवास नाईक, दिपक सामंत, विजयसिह मोंडकर यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी कमलाकांत…

Read More

न्हावेली रेवटेवाडीत होतेय पांडुरंगाचे दर्शन

अक्षय जाधव यांनी रांगोळीत साकारली विठ्ठलाची मूर्ती *⚡बांदा ता.२०-:* आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाऊन न्हावेली-रेवटेवाडी येथील आनंद शंकर जाधव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. काल शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी दुपारी गंगापूजन करण्यात आले. त्यानिमित्ताने अक्षय जाधव यांनी रांगोळीद्वारे पांडुरंगाची हुबेहूब मूर्ती रेखाटली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दर्शनाचा लाभ घेतला. तीर्थयात्रा केल्यानंतर आनंद जाधव यांनी…

Read More

शिवसेनेची आढावा समिती उद्या सावंतवाडीत

उपस्थित राहण्याचे रुपेश राऊळ यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.२०-:* शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय विभागातील आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख संजयजी पडते यांच्या नेतृत्वाखालील समितीचा सावंतवाडी तालुक्यात 21 नोव्हेंबर रोजी दौरा करणार आहे. तरी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती इच्छुक उमेदवार सहित विभागातील सर्व…

Read More

मळगाव शिवसेना शाखा प्रमुख पदी संदेश सोनुर्लीकर यांची नियुक्ती

*⚡सावंतवाडी ता.२०-: मळगाव शिवसेना शाखा प्रमुख पदी श्री संदेश दिलीप सोनुर्लेकर यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख श्री.रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख (सहकार) श्री.चंद्रकांत कासार, माजी सरपंच श्री.अर्जुन देवळी, ग्रामपंचायत सदस्य श्री.आना गावकर, उपविभाग प्रमुख श्री. महेश शिरोडकर, विलास जाधव, उदय फेंद्रे, गुरु सोनुर्लेकर ,संजय तुळसकर आधी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

ll पाऊले चालती सोनुर्लीची वाट ll

सोनुर्ली माऊलीचा आज जत्रोत्सव:दर्शनासाठी होणार लाखो भाविकांची गर्दी;रात्री रंगणार लोटांगण सोहळा माय माऊली तू माऊली जगाचीl तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली सावंतवाडी ता.२०.प्रसन्न गोंदावळे-:* ‘दीनांची माऊली कृपेची सावली’ अशी ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज, २० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव झाला नसल्याने दोन…

Read More

मालवण दत्त मंदिरातील कार्तिकोत्सवाची सांगता

भरड येथे शेकडो भाविकांची उपस्थिती : पालखी मिरवणुकीत शेकडो आबाल वृद्धांचा सहभाग *⚡मालवण ता.१९-:* एकमुखी दत्त मंदिर म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून गेले महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीतही शेकडो आबाल…

Read More

रस्त्यावर सापडलेला मोबाईल पोलिसांनी मूळ मालकास केला परत

मालवण (प्रतिनिधी) सुकळवाड येथे मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सापडलेला ओपो कंपनीचा महागडा मोबाईल पोलीसांनी मोबाईल धारक व्यक्तीचा शोध घेऊन त्यास मोबाईल परत केला. ड्युटीवर असताना पोलिसांनी दाखविलेल्या या कार्यतत्परतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे. सुकळवाड येथे मुख्य रस्त्यावर ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. बी.देऊलकर, पोलीस कॉन्स्टेबल एम. के. शिरडे, पोलीस नाईक एस. व्ही. सोनसुरकर,…

Read More

आचरा हिर्लेवाडी येथे घराला आग लागून नुकसान

*⚡मालवण ता.१९-:* आचरा हिर्लेवाडी येथील श्रीमती मीना अरुण मालवणकर यांच्या राहत्या घराला मागच्या बाजूने आग लागल्याने घरातील अन्नधान्य कपडेलत्ते जळून सुमारे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हिर्लेवाडी येथील मीना अरुण मालवणकर यांच्या घराला सकाळी मागच्या बाजूने अचानक आग लागली. मात्र ही आग कशामुळे लागली याचे…

Read More

कणकवली महाविद्यालयात शनिवारी कॅंपस इंटरव्ह्यू

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम, व बी. एस्सी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि नोकरभरती कक्ष तसेच भारत फायनान्सियल इनक्लूजन लिमिटेड यांच्यावतीने महाविद्यालयात नोकरभरती मुलाखती( कॅंपस इंटरव्ह्यू) आयोजित केले आहेत. १८ ते २८ या वयोगटातील कोणत्याही शाखेचा पदवीधरांसाठी बँकिंग व‌ फायनान्स या क्षेत्रात दरमहा ठोक पगारावर उत्साही…

Read More
You cannot copy content of this page