बॅ.खर्डेकरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राचार्य विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी कॉलेजला दिलेल्या कॉम्प्युटर लॅबचा उल्लेख करीत त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सुनिल सौदागर, श्रीनिवास नाईक, दिपक सामंत, विजयसिह मोंडकर यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी कमलाकांत परब यांनी कॉलेजसाठी काही उपयुक्त सूचना केल्या. पुढीलवर्षी ह्या माजी विद्यार्थ्यांचा पाचवा मेळावा बॅ.खर्डेकर महाविद्यालयातच व गुरुनानक जयंतीला म्हणजे ८ नोव्हेंबरला होणार असल्याचे श्री. मोंडकर यांनी जाहीर केले. या मेळाव्यात उपस्थित असलेल्यांनी सर्वांनी आपापली मनोगत व्यक्त केले. सायंकाळी स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

You cannot copy content of this page