अक्षय जाधव यांनी रांगोळीत साकारली विठ्ठलाची मूर्ती
*⚡बांदा ता.२०-:* आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाऊन न्हावेली-रेवटेवाडी येथील आनंद शंकर जाधव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. काल शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी दुपारी गंगापूजन करण्यात आले. त्यानिमित्ताने अक्षय जाधव यांनी रांगोळीद्वारे पांडुरंगाची हुबेहूब मूर्ती रेखाटली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दर्शनाचा लाभ घेतला. तीर्थयात्रा केल्यानंतर आनंद जाधव यांनी न्हावेली रेवटेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे गंगापूजन केले. अनेक वर्षांपासून ते गंगापूजन करतात. परिसरातील भाविकांनी धार्मिक परंपरा जोपासत या सोहळ्याचा लाभ घेतला.
