शिवसेनेची आढावा समिती उद्या सावंतवाडीत

उपस्थित राहण्याचे रुपेश राऊळ यांचे आवाहन

*⚡सावंतवाडी ता.२०-:* शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय विभागातील आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख संजयजी पडते यांच्या नेतृत्वाखालील समितीचा सावंतवाडी तालुक्यात 21 नोव्हेंबर रोजी दौरा करणार आहे. तरी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती इच्छुक उमेदवार सहित विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी (शिवसेना, महिला आघाडी, युवासेना) विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, जिल्हा प. सदस्य पंचायत स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दौरा पुढीलप्रमाणे माजगाव जि प सकाळी 10 वाजता असनिये साकव भूमिपूजन, .11 वाजता आंबोली पं. स. दुपारी 1 वाजता, विलवडे पं. स. सायंकाळ 4 वाजता माडखोल जि प 5.30 वाजता कोलगाव जि प. 6.30 वाजता.

You cannot copy content of this page