Headlines

Global Maharashtra Breaking News

विज वितरण कंपनीकडून अचानक नळपाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत

वीज वितरणच्या कारभाराविरोधात आशिये ग्रा.पं.जाणार न्यायालयात *⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील आशिये गावच्या नळयोजना विद्युत पुरवठा अचानकपणे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला आहे. यासंदर्भात गेल्या वर्षभरात १ लाख ९० हजार रुपयांचा भरणा करून देखील विद्युत पुरवठा खंडित केला, जी बिलावर बाकी दिसते आहे ते थकीत बिल गेली ५ वर्षे सरासरी पध्दतीने काढून ग्रामपंचायतीवर अधिभार लावण्याचं काम…

Read More

नाधवडे येथे आंबा पिक शेतीशाळा संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी कृषि विभाग वैभववाडी यांच्या मार्फत नाधवडे सरदारवाडी येथे आंबा पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आंबा बागायतदार शेतकऱ्यांना प्रा.श्री.निखिल फुटणकर, (कृषि महाविद्यालय, सांगुळवाडी) यांनी आंबा पिकाची लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, किड,-रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस.एस.कांबळे व कृषीपर्यवेक्षक ए.आर.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन…

Read More

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात “करिअर कट्टा” कार्यशाळेचे आयोजन…

वैभववाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व समन्वयक यांच्यासाठी मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11: 30 वा. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय याठिकाणी ” करीअर कट्टा कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा…

Read More

नगरपंचायत निवडणुकासह सर्वच निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार…

तालुका निरीक्षक महेंद्र सावंत यांची माहिती… वैभववाडी प्रतिनिधी आगामी नगरपंचायत निवडणूकांसह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पक्षाच्या धोरणानुसार राष्ट्रीय काॕग्रेस स्वबळावर लढविणार आहे. वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत 17 जागा काॕग्रेस लढविणार आहे. अशी माहीती वैभववाडी तालुका निरीक्षक महेंद्र सावंत यांनी दिली आहे. वैभववाडी येथील काॕग्रेसच्या कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी कणकवली शहर अध्यक्ष…

Read More

अखेर सागरमित्रांच्या थकित वेतनाचा प्रश्न निकाली…

खासदार विनायक राऊत यांचा पुढाकार;शासनाकडून १ कोटी ३ लाख ऐंशी हजाराचे अनुदान मंजूर *⚡कुडाळ ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरमित्रांचे वेतन गेले आठ महिने प्रलंबित होते. त्यामुळे मत्स्य विभागाच्या सर्व योजना सर्वसामान्य मच्छिमारांपर्यंत पोहोचविणारा सागरमित्र उपाशीपोटी काम करत होते. ही बाब खासदार विनायक राऊत यांची त्यांच्या सिंधुदुर्ग कार्यालयात सप्टेंबर 2019 मध्ये भेट घेऊन आपली प्रलंबित वेतनाची अडचण…

Read More

कणकवली येथे 24 डिसेंबर रोजी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुका प्रवासी संघ, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, सिंधुदुर्ग आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 24 डिसेंबरला दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 वा. यावेळेत संजीवनी हॉस्पिटल येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांचे डोळे तपासणे, मोतिबिंदू तपासणी, उपचार, ऑपेशनची तपासणी केली जाणार असून ही तपासणी सर्जन डॉ. विद्याधर तायशेट्ये, नेत्रतज्ज्ञ…

Read More

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

सिलिंडरने घेतला अचानक पेट; ओले गोणपाट टाकून आग आटोक्यात *⚡कणकवली ता.०४-:* नेहमीच वर्दळ असलेल्या कणकवली येथील आप्पासाहेब पर्टवर्धन चौकातील हॉटेल काकडेमध्ये अचानक सिलिंडरने पेट घेतला. या प्रकारानंतर याठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रसंगावधान राखत पो. कैलास इंपाळ, वाहतूक पोलीस प्रकाश गवस व संदेश अबिटकर यांनी पेट घेतलेल्या सिलिंडर रस्त्यावर आणून त्यावर ओले केलेले गोणपाट टाकून…

Read More

मालवणात मुलींची धावणे स्पर्धा

*⚡मालवण ता.०४-:* मालवण मधील मातोश्री राखीताई पाटकर स्पोर्ट्स क्लबचा शुभारंभ दि. १९ डिसेंबर रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता १४ आणि १९ वर्षाखालील मुलींची १०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे . ही स्पर्धा जिल्हा मर्यादित असून विनाशुल्क आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे….

Read More

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून ठोस आश्वासन द्यावे…

गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईची राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी… मालवण (प्रतिनिधी) पगार वाढ सोबत एसटी महामंडळाचे शासनसेवेत विलीनीकरण करण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करून ठोस आश्वासन कर्मचाऱ्यांना द्यावे अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई या संस्थेतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे….

Read More

लायन्स क्लब सावंतवाडी आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

*⚡सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडीत लायन्स क्लब कडून आयोजित करण्यात आलेल्या “जागतिक शांतता” या विषयावरील चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत आर.पी.डी हायस्कूलची विद्यार्थिनी सिध्दी राऊळ हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी अभिजित कुडतरकर याने पटकावला आहे. तर कळसुलकर इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी तन्मय देशपांडे याने तृतीय क्रमांक…

Read More
You cannot copy content of this page