कणकवली येथे 24 डिसेंबर रोजी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुका प्रवासी संघ, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, सिंधुदुर्ग आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 24 डिसेंबरला दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 वा. यावेळेत संजीवनी हॉस्पिटल येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांचे डोळे तपासणे, मोतिबिंदू तपासणी, उपचार, ऑपेशनची तपासणी केली जाणार असून ही तपासणी सर्जन डॉ. विद्याधर तायशेट्ये, नेत्रतज्ज्ञ प्रसाद गुरव, डॉ. कदम व जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत. गरजू व्यक्तींना नेत्रविकारावरील औषधे व आवश्यकतेप्रमाणे चष्मे मोफत दिले जाणार आहेत. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रवींद्र मुसळे यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर (9422379090), तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर (7666026349) या क्रमांकावर साधावा.

You cannot copy content of this page