अखेर सागरमित्रांच्या थकित वेतनाचा प्रश्न निकाली…

खासदार विनायक राऊत यांचा पुढाकार;शासनाकडून १ कोटी ३ लाख ऐंशी हजाराचे अनुदान मंजूर

*⚡कुडाळ ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरमित्रांचे वेतन गेले आठ महिने प्रलंबित होते. त्यामुळे मत्स्य विभागाच्या सर्व योजना सर्वसामान्य मच्छिमारांपर्यंत पोहोचविणारा सागरमित्र उपाशीपोटी काम करत होते. ही बाब खासदार विनायक राऊत यांची त्यांच्या सिंधुदुर्ग कार्यालयात सप्टेंबर 2019 मध्ये भेट घेऊन आपली प्रलंबित वेतनाची अडचण मांडली होती.

यावेळी खासदार राऊत यांनी तात्काळ सागरमित्रांसमोरच मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त व अव्वर सचिव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून सागरमित्रांच्या प्रलंबित वेतनाबाबत लक्ष वेधून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच तात्काळ मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना पत्रही दिले होते. खासदार राऊत यांनी केलेल्या सागरमित्रांच्या प्रलंबित वेतनाबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरमित्रांच्या वेतनासाठी रुपये एक कोटी तीन लाख ऐंशी हजार एवढे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे सागरमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी खासदार राऊत यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी मत्स्य सहाय्यक आयुक्त श्री. मालवणकर , माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जि.प.सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य श्री.सोमा घाडीगांवकर, युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page