तालुका निरीक्षक महेंद्र सावंत यांची माहिती…
वैभववाडी प्रतिनिधी आगामी नगरपंचायत निवडणूकांसह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पक्षाच्या धोरणानुसार राष्ट्रीय काॕग्रेस स्वबळावर लढविणार आहे. वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत 17 जागा काॕग्रेस लढविणार आहे. अशी माहीती वैभववाडी तालुका निरीक्षक महेंद्र सावंत यांनी दिली आहे. वैभववाडी येथील काॕग्रेसच्या कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, प्रवीण वरुणकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवार, तालुकाध्यक्ष दादामियाॕं पाटणकर, महिला तालुकाध्यक्ष मिनाताई बोडके, महेंद्र नाटेकर, बाळा सुतार आदी उपस्थित होते. निरीक्षक सावंत पुढे म्हणाले, काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आगामी येणाऱ्या सर्व निवडणूका या स्वबळावर लढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या सर्व जागांवर काॕग्रेसचे उमेदवार उभे करण्यात येणार असून त्याची यादी वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या 4 ते 5 जागांवर काॕग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी काहीही केलेले नाही.असा आरोप सावंत यांनी केला. आघाडीतील घटक पक्षांकडून स्थानिक पातळीवर प्रस्ताव आला होता. माञ पक्षाच्या धोरणानुसार या निवडणूक स्वबळावरच लढविण्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला. फोटो- वैभववाडी येथे पञकार परिषदेत बोलताना तालुका निरीक्षक महेंद्र सावंत व काॕग्रेस पदाधिकारी .
