*⚡सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडीत लायन्स क्लब कडून आयोजित करण्यात आलेल्या “जागतिक शांतता” या विषयावरील चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत आर.पी.डी हायस्कूलची विद्यार्थिनी सिध्दी राऊळ हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी अभिजित कुडतरकर याने पटकावला आहे. तर कळसुलकर इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी तन्मय देशपांडे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेला सावंतवाडीतील सुमारे ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून तीन विजेते काढण्यात आले असून, त्यांची चित्रे रिजन क्षेत्रात पुढील स्पर्धेसाठी पाठवण्यात आली आहेत. यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांना क्लबच्या वतीने प्रशस्तिपत्र देण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी सर्व विजेत्यांचे लायन्स क्लब अध्यक्ष अँड परिमल नाईक व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
लायन्स क्लब सावंतवाडी आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…
