राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून ठोस आश्वासन द्यावे…

गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईची राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी…

मालवण (प्रतिनिधी) पगार वाढ सोबत एसटी महामंडळाचे शासनसेवेत विलीनीकरण करण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करून ठोस आश्वासन कर्मचाऱ्यांना द्यावे अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई या संस्थेतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. एसटी महामंडळात प्रामुख्याने मराठी माणसे कार्यरत आहेत. यापूर्वीच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर समंजसपणे तोडगा निघत होता. त्यामुळे आताही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या व भावना लक्षात घेऊन या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे अध्यक्ष रवींद्र मुकनाक यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page